“विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तयार होण्यासाठी वर्ष लागतात आणि तुटण्यासाठी एक सेकंद आणि निभावण्यासाठी पूर्ण आयुष्य.”
जिथे पाणी असत तिथेच जीवन असतं अगदी तसच जिथे विश्वास असतो तिथेच नात असतं
फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.
विश्वासघात झाल्यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण होतं. इतकंच नाही तर लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो
आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो, आणि आपण लोकांवर ठेवतो…
आयुष्यात शेवट आठवणीच राहतात
विश्वास कमवायला कित्येक वर्षे लागतात.. गमवायला सेकंद ही पुरेसा
ठरतो..
किंमत प्रेमाची नाही तर विश्वासाची अधिक असते, त्यामुळे प्रेमात कधीही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका
“पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा स्वासाला जास्त किंमत असते, तसेच प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
किती त्रास द्यावा
एखाद्यायालाही काही प्रमाण असते.
आपल्या वरूनच विचार करावा
समोरच्यालाही मन असते
विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि पुन्हा, तो त्या फांदीवर बसेलच याची काही शाश्वती नाही.
विश्वासघात करणे सोपे आहे, पण त्या विश्वासाची परतफेड करणे खुप अवघड आहे..
शरीराला श्वासाची आणि नात्यांना विश्वासाची गरज असते कारण श्वास संपल्यावर जीवन संपतं आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं
स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो, तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.
“प्रत्येकावर विश्वास ठेवत जाऊ नका कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्या फिलिंग शी खेळू शकतात.
विश्वास ठेवा…… आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगल घडत असतं. इतकचं की, ते आपल्याला दिसत नसतं.
माणूस जगतो आशेच्या किरणावर आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर
विश्वास हा स्टीकर सारखा असतो. दुसऱ्यादा पहिल्यासारखा बसत नाही.
सोडून दिलं मी आता
स्वताला सिद्ध करणं, असेल विश्वास तर बोला नाही तर विषय सोडून द्या…
विश्वास हा शब्द
वाचायला एक
सेकंद लागतो
पण
निभवायला
आयुष्य कमी पडते
विश्वास हा
खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या
प्रत्येक चुकीबरोबर
तो कमी होत जातो…
प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टींशी तुम्ही जर प्रामाणिक नाही राहिलात तर त्या पुन्हा मिळवणे कधीच शक्य नाही
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी
जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे
विश्वास….
आयुष्यात कडू बोलणारे लोक असले तरी चालेल
फक्त गोड बोलून धोका
देणारे लोक नको.
जीवनात चांगल्या माणसांना शोधण्याची गरज भासत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. चांगली माणसं आपोआप आयुष्यात येतात.
पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.