marathi aarti sangrah | आरती संग्रह मराठी

1. शारदा माता आरती

कोमल तनमन सुंदर वनजन

करितो तुला वंदन, नमो शरद मां…..धू

विश्वाची तू चालक शक्ती

तू विद्या दायी माते तू विद्यादायी

दैवाजिक तुज वंदन करितो

मंगल मन होई माते मंगल मन होई

कोमल तनमन सुंदर वनजन करितो तुला वंदन

नमो शारदे मां, नमो शारदे मां….१

राईचा तू पर्वत करीशी

पर्वताची राई माते पर्वताची राई

विना धारिनी मखमल होई

संकट निवनी माते संकट निवरनी

कोमल तनमन सुंदर वनजन करितो तुला वंदन

नमो शारदे मां, नमो शारदे मां….२

2. शारदा माता आरती

शारदे सप्रातुसरे करुनी वंदना…. धु

वाद्यातांची बालिकांची

घणशांची नाईकांची

सर्वदेव वंदतांची अग्र पुजना

शारदे सप्रातुसरे करुनी वंदना…..१

गळामाळ मुकुट शिरी

धरिले मी विनाकरी

हर्शमुख बैसलेली मयुर वासना

शारदे सप्रातुसरे करुनी वंदना…..२

चौषश्टी शास्त्रज्ञान

विद्या दे विधिमान

जगी भरुनी उरलेली वीद्य सुगंधा

शारदे सप्रातुसरे करुनी वंदना…..३

3. शारदा माता आरती

ओवाळु आरती शारदा तुला

माते तुज पाहुनीया जीव धोनीला

ओवाळु आरती शारदा तुला. . . .धु

चार वेद शास्त्र मुग्ध्द राहिले

ब्र्हम्हदिप सुवर्ण मूणि तेज जाहीले

गुण तुझे वर्णविता शेष भासला

ओवाळु आरती शारदा तुला…१

क्रोध तुझा पहूनिया डोळे डगमगे

विश्व रूप पहूनिया काळजी पडे

भक्तजणा रक्षणासी दैत मारीला

ओवाळु आरती शारदा तुला….२

आत्मज्योती आरती तुज आज लाविली

पंचप्राण पुष्पांजली चरण वाहिली

मगसुमने गुंफुनिया हार वाहिला

ओवाळु आरती शारदा तुला….३

4. शारदा माता आरती

रूप मनोहर द्याता इस पदे कुवती

भवणी दूर पदे कुवती

मंगल ध्यास सुखाचे,, मंगल मय मूर्ती

जय जय शारदे माते, जय जय शारदे माते….३वेळा

भैय जय जय शारदे माते मंगल ध्यास सुखाचे….२

मंगल मय मूर्ती जय जय शारदे माते….धू

क्रांती विलोर सरल्या चंद्रही विरलाजे

पौर्णिमा चंद्रही विरलाजे

अशुभ्र शुभोभित_ हिमदिनी तेजे

जय जय शारदे माते, जय जय शारदे माते

मंगल ध्यास सुखाचे,, मंगल मय मूर्ती

जय जय शारदे माते,……..१

वीणा दिव्य स्वरांनी नादमृद उदके

शारदे नादमृद उदके

यावे पुष्प धरोनी,, ही वसुधरा नटले

जय जय शारदे माते, जय जय शारदे माते

मंगल ध्यास सुखाचे,, मंगल मय मूर्ती

जय जय शारदे माते….२

पृष्टिक जळ सामान्य बह्यातर दिसे

शारदे बह्यातर दिसे

फलवूनी पुल पिसारा,, कलामोर नाचे

जय जय शारदे माते, जय जय शारदे माते

मंगल ध्यास सुखाचे,, मंगल मय मूर्ती

जय जय शारदे माते……..३

5. आरती शारदा माता

आरती शारदा माता, माझी तुझ्यावरी श्रद्धा

आरती शारदा माता…….धु

मोर मोर गुंड शिरी

बसलीस मोरावरी

नसलीस लाल साडी

तुझ्या अंगी हिरवो चोळी

आरती शारदा माता, माझी तुझ्यावरी श्रद्धा….१

कानी कुंडल वण माळ

रूप तुझा ग सावळा

गळ्यामध्ये मोती हार

रूप तुझा ग सुंदर

आरती शारदा माता, माझी तुझ्यावरी श्रद्धा….२

भव भव दूर करी

आलो तुझ्या चरणाशी

न्यावे मला पायापाशी

न्यावे तू माला शेवेशी

आरती शारदा माता, माझी तुझ्यावरी श्रद्धा

आरती शारदा माता…..३

6. माता जी की आरती

मयुर गडवरी गडावरी ग तुझा वास

भक्त येतील दर्शनास……धू

पिवळे पातळ ग पातळ बुद्रेदार

अंशी चोळी ग हिरवीगार

तुझ्या पैठणीची पैठणीचीग ओवी खास

भक्त येतील दर्शनास

मयुर गडवरी गडावरी ग तुझा वास

भक्त येतील दर्शनास……..१

जाई जुईचीग जुईची आनीले फुले

भक्त गुफुनी हार तुले

माळ घातीली ग घातीली अंबी केस

भक्त येतील दर्शनास

मयुर गडवरी गडावरी ग तुझा वास

भक्त येतील दर्शनास……..२

बिंदी बिजवळा बिजवळाग बाहि शोभे

कांजी कापड भोवती तुझे

तुझ्या नभेत ग नभेत हिरवा घास

भक्त येतील दर्शनास

मयुर गडवरी गडावरी ग तुझा वास

भक्त येतील दर्शनास……..३

7. दुर्गा देवीची आरती

दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी

वारी वारी जन्ममरणांते वारी

हारी पडलो आता संकट निवारी…..१

जय देव जय देव… महिशा सुर वांदिनी

सूरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देव जय देव…..

त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही

चारी श्रमले परंतु न बाले काही

सही विवाद करिता पडले प्रवाही

ते तू भक्ता लागे पवसो लवलाही…..२

जय देव जय देव… महिशा सुर वांदिनी

सूरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देव जय देव…..,,

त्रस्नवदने प्रसन होशी निजदासा

केलशापासूनी सोडी तोडी भवपाशा

अंबे तुज वाचून कोण परविल आशा

नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा

जय देव जय देव… महिशा सुर वांदिनी

सूरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जय देव जय देव…..,,३

8. शारदा माता आरती

आरती गातो माझ्या शारदे मातेची….धू

रक्षण करितेची,,

दुःख हरितेची

माता माझ्या गावाची..

आरती गातो माझ्या शारदा माताची…१

स्टेज वर बसुनी आहे

मोरावरूनी पाहे

माता माझ्या गावाची

आरती गातो माझ्या शारदा माताची…२

अंगावर लाल शालू

हातामध्ये विना

माता माझ्या गावाची

आरती गातो माझ्या शारदा माताची…३

कपाळी कुंकू टिळा

नाकी नत मोत्याची

माता माझ्या गावाची

आरती गातो माझ्या शारदा माताची…४

पायामध्ये पैंजण

काणी कुंडल सोन्याची

माता माझ्या गावाची

आरती गातो माझ्या शारदा माताची…५

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top